February 27, 2025 1:47 PM February 27, 2025 1:47 PM
9
Bhopal Gas Tragedy : मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
भोपाळच्या युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड कंपनीत झालेल्या वायू दुर्घटनेतील विषारी कचरा मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील पिथमपूर भागात हलवून त्याची विल्हेवाट लावण्याच्या मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांच्या खंडपीठाने युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड कंपनीतल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत आज होणाऱ्या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्यास ही नकार दिला. राष्ट्रीय पर्यावरण अभियां...