October 23, 2025 1:56 PM October 23, 2025 1:56 PM
27
देशभरात भाऊबीजेचा सण आनंदात साजरा
देशभरात आज भाऊ बहिणीचं नातं दृढ करणारा भाऊबीजेचा सण आनंदात साजरा केला जात आहे. दिवाळीच्या पाचव्या दिवशी येणारा हा सण भाईदूज, यम द्वितीया, भाई टीका या नावानंही ओळखला जातो. आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करत भावाचं औक्षण करतात. तर ओवाळणी म्हणून भाऊ बहिणींना त्यांचं संरक्षण करण्याचं वचन देतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भावाबहिणीच्या अतूट नात्याचं प्रतीक असलेला हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन...