June 21, 2024 9:51 AM June 21, 2024 9:51 AM
17
लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भर्तृहरी महताब यांची नियुक्ती
भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली असल्याची माहिती, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होईपर्यन्त, महताब अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील असं रिजिजू यांनी संदेशात म्हंटलं आहे. सदस्यांना शपथ घेण्याच्या कामी हंगामी अध्यक्षांना मदत करण्यासाठी घटनेच्या कलम 99 अन्वये सुरेश कोडीकुन्नील, टी बालु, राधा मोहन सिंग,...