January 17, 2025 10:32 AM January 17, 2025 10:32 AM

views 13

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 68 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीत, 70 जागांपैकी 68 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार आहे. उर्वरित दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दल आणि राम विलास गटाच्या जनशक्ती पक्षाला देण्यात आल्या आहेत.   बुरारी विधानसभा मतदारसंघातून संयुक्त जनता दल आणि देओली विधानसभा मतदार संघातून जनाशक्ती पक्ष-रामविलास गटाचा उमेदवार निवडणूक लढवतील असं भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी काल प्रसार मध्यमांशी बोलताना सांगितलं.

January 12, 2025 4:03 PM January 12, 2025 4:03 PM

views 12

प्रदेश भाजपाचं अधिवेशन शिर्डी इथं सुरु

प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनाला शिर्डी इथं आज सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुुरुवात झाली. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. तसंच राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं.   विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेनं शिवशाही स्थापन करण्यासाठी अभूतपूर्व यश दिलं आहे. भाजपाच्या आतापर्यंतच्या इतिहासाचं हे सुवर्णशिखर आ...

December 3, 2024 3:37 PM December 3, 2024 3:37 PM

views 17

भाजपाकडून विधीमंडळ नेतेपदाच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षकांची नेमणूक

राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि चर्चा सुरू आहेत. राज्यात भाजप विधिमंडळ गटनेता निवडीसाठी पक्षानं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या ४ डिसेंबरला होणार असून त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.   दरम्यान, मुंबईत आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आ...