February 16, 2025 7:01 PM February 16, 2025 7:01 PM
19
भारत टेक्स प्रदर्शनातून विकसित भारताच्या भविष्याचं चित्र दिसतं – प्रधानमंत्री
भारत टेक्स प्रदर्शनातून भारतीय संस्कृती आणि विकसित भारताच्या भविष्याचं चित्र दिसत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं आयोजित भारत टेक्स २०२५ मध्ये बोलत होते. भारत टेक्स आता जागतिक पातळीवरचा महोत्सव झाला असून हे प्रदर्शन जगभरातल्या कापड उद्योजकांसाठी एक चांगलं व्यासपीठ बनलं आहे. वेगवेगळ्या देशांची कापड संस्कृतीविषयीच्या माहितीची देवाणघेवाण या प्रदर्शनाच्या निमित्ताने होत आहे, असंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. गेल्यावर्षी आपण कापड उद्योगा...