January 7, 2025 1:45 PM January 7, 2025 1:45 PM
5
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सीबीआय च्या ‘भारत पोल’ या पोर्टलचं उद्घाटन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली इथं सीबीआय नं विकसित केलेल्या ‘भारत पोल’ या पोर्टलचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी सीबीआय च्या ३५ अधिकाऱ्यांना असामान्य सेवेबद्दल पोलीस पदकं प्रदान केली. विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि तपासातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्रीय गृहमंत्री पदकाचा यात समावेश आहे. ‘भारतपोल’ पोर्टल आंतरराष्ट्रीय तपासाला नव्या युगात घेऊन जाणार असल्याचं अमित शाह यावेळी म्हणाले. इंटरपोलकडून आंतरराष्ट्रीय सहाय्य मिळवण्यासाठी विनंती प्रक्रिया सुव्यवस्थित करणं, हे ‘भारत...