October 22, 2024 11:36 AM

views 7

भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या अकोला इथल्या विचार सभेत गोंधळ

भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांची काल अकोला इथं झालेली विचार सभा, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरम-लोकशाही मंच द्वारे घेण्यात आलेल्या या सभेत योगेंद्र यादव यांचं भाषण सुरू होताच, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. यावरून मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, धक्काबुक्की झाल्यानं पोलिसांनी वंचितच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.