April 7, 2025 7:31 PM April 7, 2025 7:31 PM
9
संरक्षण मंत्रालयाचे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडशी दोन हजार ३८५ कोटी रुपयांचे करार
MI 17 V5 हेलिकॉप्टर्सच्या एअरक्राफ्ट मॉडिफिकेशन किटसाठी संरक्षण मंत्रालयानं भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडशी दोन हजार ३८५ कोटी रुपयांचे करार केले आहेत. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वॉरफेअर सूटमुळे हेलिकॉप्टर प्रतिकूल वातावरणात अधिक सक्षमपणे कार्यरत राहू शकणार आहे. या प्रकल्पामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि संबंधित उद्योगांना चालना मिळणार आहे.