October 23, 2024 10:20 AM October 23, 2024 10:20 AM
33
कर्तारपूर साहिब कॉरिडॉर कराराची वैधता आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्यास भारत आणि पाकिस्तानची मान्यता
भारत आणि पाकिस्ताननं कर्तारपूर साहिब कॉरिडॉर कराराची वैधता आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याचं मान्य केलं आहे. कर्तारपूर साहिब कॉरिडॉरद्वारे भारतातील यात्रेकरूंना पाकिस्तानमधील कर्तारपूर इथल्या पवित्र गुरुद्वारा दरबार साहिब, नारोवाल या ठिकाणांना भेट देता येते. यापूर्वी पाच वर्षांसाठी 24 ऑक्टोबर 2019 मध्ये हा करार करण्यात आला होता, त्यात आता आणखी वाढ करण्यात आली आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान, प्रत्येक यात्रेसाठी पाकिस्तानकडून आकारलं जाणारं 20डॉलर सेवा शुल्क काढ...