March 14, 2025 6:18 PM March 14, 2025 6:18 PM

views 6

भंडाऱ्यात झालेल्या स्फोटाप्रकरणी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

भंडारा जिल्ह्यातल्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात गेल्या २४ जानेवारीला झालेल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा स्फोट यंत्र आणि उपकरणांची दुरुस्ती करण्यात झालेल्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गुन्हा दाखल करण्यात आलेले चारही अधिकारी संरक्षण उत्पादन विभागातील आहेत.    स्फोटानंतर स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या निष्कर्षावर आधारित हा एफआयआर नोंदवण्यात आला.    इमारत क्रमांक २३ मधील आरएक्स विभागातील यंत्र आणि उपकरणे खराब झाली ...

January 25, 2025 7:06 PM January 25, 2025 7:06 PM

views 5

भंडारा जिल्ह्यातल्या आयुध निर्माण कंपनीकडून मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची मदत

भंडारा जिल्ह्यातल्या आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची मदत देण्याचं कंपनी प्रशासनानं जाहीर केलं आहे.   तसंच कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्याचं आश्वासन कंपनी प्रशासनानं दिलं आहे. दरम्यान, या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असं पोलिसांनी सांगितलं.

January 24, 2025 9:31 PM January 24, 2025 9:31 PM

views 3

भंडारा : आयुध निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात आयुध निर्मिती कारखान्यात स्फोट होऊन ८ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेच्या वेळी कारखान्यात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचा शोध सुरु आहे. स्फोटातल्या जखमींना भंडारा रूग्णालयात दाखल केलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि आरोग्य विभागामार्फत बचावकार्य सुरु आहे.  स्फोटात मृत्यू झालेल्या कामगारांच्या प्रति संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला आहे. या स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी ...