January 3, 2026 1:43 PM January 3, 2026 1:43 PM
14
भगवान गौतम बुद्धांचं ज्ञान, त्यांनी दाखवलेला मार्ग हा संपूर्ण मानवतेचा आणि कालातीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
भगवान गौतम बुद्धांचं ज्ञान, त्यांनी दाखवलेला मार्ग हा संपूर्ण मानवतेचा आणि कालातीत आहे. भगवान बुद्ध सर्वांचे आहेत आणि ते सर्वांना जोडून ठेवतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीतल्या राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, भगवान बुद्धांशी संबंधित, पवित्र पिप्रावा अवशेषांच्या, भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे अवशेष भारतात परत आल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. हे अवशेष भारताबाहेर नेणाऱ्यांसाठी ...