March 23, 2025 3:32 PM March 23, 2025 3:32 PM

views 24

हुतात्मा क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना देशाची आदरांजली

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले तीन वीर क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना संपूर्ण देश आज श्रद्धांजली वाहत आहे. १९३१ मध्ये आजच्याच दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात या तीन वीरांना फाशी देण्यात आली होती. या दिवसाचं शहीद दिन म्हणून स्मरण करण्यात येतं.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही वीरांना श्रद्धांजली वाहिली आहे. समाजमाध्यमावर मोदी यांनी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे. स्वातंत्र्य आणि न्यायासाठी या क्रांतीकारकांनी दाखवलेलं दुर्दम्य साहस आणि ...

September 28, 2024 3:00 PM September 28, 2024 3:00 PM

views 8

थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली

थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली आहे. देशाभिमानासाठी प्राणांची आहुती देणारे भगतसिंग अमर शहीद असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलं आहे. शहीद भगतसिंगांनी केवळ ब्रिटिश राजसत्तेला आव्हान दिलं असं नव्हे तर मातृभूमीचं स्वातंत्र्य आणि समृद्धीकरता आयुष्य अर्पण केलं असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.