March 29, 2025 7:34 PM March 29, 2025 7:34 PM
12
IPL वर सट्टा लावणाऱ्या ५ जणांना जालन्यातून अटक
जालना जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे ४ बुकी आणि एका सट्टेबाजाला चंदनझिरा पोलिसांनी आज अटक केली. आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या सामन्यावर सट्टा लावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी या कारवाईत मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्यासह एकूण ८ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.