January 23, 2025 11:08 AM January 23, 2025 11:08 AM

views 20

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांच उद्दीष्ट मुलींना समाजाच्या मुख्य धारेत सामावून घेणे आहे- जे.पी. नड्डा

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांच उद्दीष्ट केवळ मुलींना शिक्षित करणं नसून त्यांना समाजाच्या मुख्य धारेत सामावून घेणे आणि त्यांचे सक्षमीकरण करण्याचा असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. सुदृढ बाळासाठी, गर्भवतीच्या आरोग्याच्या काळजीपासून ते प्रसुतीपर्यंतच्या आरोग्य सेवेचे महत्त्व तसंच सर्व तपासण्या, लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित केलं.   केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री अन्नपूर्णा देवी यांनीही योजनेचे य...

January 22, 2025 7:46 PM January 22, 2025 7:46 PM

views 18

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम

मुलींची सुरक्षितता, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज दहा वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त येत्या महिला दिनापर्यंत म्हणजेच ८ मार्चपर्यंत दशकपूर्ती अभियान राबवण्यात येणार आहे.  आज  राज्यात ठिकठिकाणी अभियानाचा प्रांरभ करणारे कार्यक्रम झाले.  नाशिक महानगरपालिकेत आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्तांनी उपस्थितांना बेटी बचाव बेटी पढाओ अभियानाची शपथ दिली. धुळ्यात जनजागृती रॅलीने अभियानाला सुरुवात झाली. परभणीतही कार्यक्रम आयोजित झाला होता.

January 22, 2025 8:21 PM January 22, 2025 8:21 PM

views 8

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची आज दशकपूर्ती

बेटी बचाओ - बेटी पढाओ या अभियानाला आज दहा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्यात सशस्त्र दल, निमलष्करी दल, दिल्ली पोलिस, विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविकांच्या महिला अधिकारी सहभागी होतील.   बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा भाग असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला देशात उत्तम प्रतिसाद मिळत असून, या योजनेत आतापर्यंत चार कोटीहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेत आठ पूर्णांक दोन दशांश व्याजदर दिला जातो.   या अभियानात सर्व वर्ग सहभागी झाले असं प्रधा...