January 17, 2025 1:34 PM

views 13

इस्रायल आणि हमास दरम्यान युद्धविराम लागू झाल्याची नेतान्याहू यांची घोषणा

कतारमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातल्या वाटाघाटीनंतर गाझामध्ये ओलिस ठेवलेल्यांना सोडवण्यासाठी आणि युद्धविराम लागू करण्यासाठी करार झाला असल्याचं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी आज जाहीर केलं.   नेतन्याहू यांनी करारावर मतदान घेण्यासाठी आज सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती, त्यात या कराराला मान्यता देण्यात आली. हा करार यशस्वीरित्या पार पडल्या बद्दल नेतान्याहू यांनी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. इस्रायल आणि हमासमध्ये गेली 15 महिने संघर्ष सुरू होता त्यामुळे या करारानंतर ओली...

October 10, 2024 10:34 AM

views 19

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन आणि इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी काल रात्री दूरध्वनीवरून चर्चा केली. सुमारे अर्ध्या तासाची ही चर्चा थेट आणि महत्त्वपूर्ण होती असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. लेबनानमधील विशेषतः बैरुतमधील सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी हानी पोचेल अशी दक्षता घेण्याची सूचना बायडन यांनी केली. हल्ल्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितहानीबद्दल बायडन यांनी चिंता व्यक्त केली.

August 20, 2024 11:12 AM

views 17

इस्रायलची ओलिस ठेवलेल्यांच्या सुटकेच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला मान्यता

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी जेरुसलेम इथं तीन तास चर्चा केल्यानंतर इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतान्याहू यांनी हमासनं ओलिस ठेवलेल्या इस्रायलींच्या सुटकेबाबत मध्यस्थी करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव मान्य केला. इस्रायलच्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन ओलिसांच्या सुटकेसाठी मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाशी इस्रायल वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार नेतान्याहू यांच्या कार्यालयानं प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केला. नेतान्याहू यांनी अमेरिकेच्या प्रस्तावाला पहिल्यांदाच जाहीरर...

June 24, 2024 3:09 PM

views 24

हमासला पूर्णपणे सत्ताच्युत करेपर्यंत युद्ध चालूच राहील- बेंजामिन नेतान्याहू

गाझापट्टीतल्या संघर्षाचा जोर ओसरला असला तरी हमासला पूर्णपणे सत्ताच्युत करेपर्यंत युद्ध चालूच राहील, असं इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी जाहीर केलं आहे. दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, इस्राएली फौजा लौकरच लेबनॉन हद्दीवर पाठवल्या जातील. या भागात हिजबुल्लांबरोबर गेले काही दिवस चकमकी वाढल्या आहेत.