August 28, 2024 1:34 PM August 28, 2024 1:34 PM

views 11

पश्चिम बंगालमध्ये भाजपानं जाहीर केलेल्या ‘बंदला’ संमिश्र प्रतिसाद

पश्चिम बंगालमध्ये भाजपानं आज जाहीर केलेल्या ‘बंदला’ संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच झालेल्या ‘नबन्ना अभिजन’ आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ आज भाजपानं बंगाल मध्ये ‘बंदची हाक’ दिली होती. दरम्यान, कोलकत्यात तुरळक प्रमाणात वाहतूक सुरु असून दुकानं तसंच शाळा, महाविद्यालयं चालू  असल्याचं वृत्त आहे.