October 18, 2025 3:12 PM October 18, 2025 3:12 PM

views 23

फरार हिरे व्यापारी मेहुुल चोकसी याची अटक योग्य असल्याचा बेल्जियमच्या न्यायालयाचा निर्वाळा

फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याला भारताच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी चोकसीला केलेली अटक योग्य असल्याचा निर्वाळा बेल्जियमच्या एका न्यायालयानं काल दिला. त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेतलं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. १३ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोकसी आरोपी आहे. सीबीआयच्या विनंतीवरून अँटवर्प पोलिसांनी त्याला ११ एप्रिल रोजी अटक केली होती. आता ही अटक योग्य असल्याच्या निर्णयाविरोधात १५ दिवसांच्या आत बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. ...