March 22, 2025 1:33 PM March 22, 2025 1:33 PM
22
बिहारच्या स्थापना दिनानिमित्त बिहारवासीयांना प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या स्थापना दिनानिमित्त बिहारवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिहार ही प्राचीन काळापासून ज्ञान आणि विकासाची भूमी असल्याचं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. बिहारचे नागरिक त्यांची प्रतिभा, निश्चय आणि कष्ट यातून विकसित बिहारसाठी आणि पर्यायाने समृद्ध भारतासाठी भरीव योगदान देत राहतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहारचं वर्णन दिग्गज व्यक्तिमत्त्वांची पवित्र भूमी असं केलं आ...