March 25, 2025 7:03 PM March 25, 2025 7:03 PM

views 6

बीड मारहाणीप्रकरणी सतीश भोसलेला विशेष वागणूक दिल्याच्या आरोपावरून २ पोलिसांचं निलंबन

बीड जिल्ह्यात मारहाणीच्या प्रकरणात अटक झालेल्या सतीश भोसले याला पोलिसांनी विशेष वागणूक दिल्याच्या आरोपावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. तसंच, ठाणेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कर्मचाऱ्यांसह इतर अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे. 

January 4, 2025 8:26 PM January 4, 2025 8:26 PM

views 23

संतोष देशमुख हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक, १८ जानेवारीपर्यंत कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन फरार आरोपींना बीड पोलीस दलाच्या विशेष पथकानं आज सकाळी पुण्यात अटक केली. या दोघांना पुढील तपासासाठी सी आय डी च्या ताब्यात देण्यात येणार आहे, असं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितलं . या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना फरार घोषित केलं होतं. कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे.