September 21, 2025 7:29 PM September 21, 2025 7:29 PM

views 9

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार – मंत्री पंकजा मुंडे

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचं मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. अतिवृष्टी झाल्यामुळे जसं नुकसान झालं आहे तसं जिथं पाऊस कमी पडला आहे तिथंही पिकांचं नुकसान झालं आहे, त्याचेही पंचनामे केले जातील असं मुंडे म्हणाल्या. नदीपात्रात अतिक्रमण केल्याप्रकरणी सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुंडे यांनी प्रशासनाला दिल्या.