January 5, 2025 7:37 PM January 5, 2025 7:37 PM
6
बीडमधे स्वच्छ माझे अंगण उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कुटुंबाचा सन्मान
बीड जिल्ह्यात, स्वच्छ माझे अंगण उपक्रमांतर्गत ४ लाख ७२ हजारहून अधिक कुटुंबांमध्ये स्पर्धा होणार असून येत्या प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट कुटुंबाचा सन्मान केला जाणार आहे. बीड जिल्ह्यात १३५ गावामध्ये घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन आराखड्यानुसार काम सुरू आहे. यासंबंधी ग्रामस्थांमध्ये अधिक जनजागृती होण्यासाठी १ जानेवारी २६ जानेवारी या कालावधीत स्वच्छ माझे अंगण उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात वैयक्तिक शौचालय, शोषखड्डा, खत खड्डा, तसंच कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन कचराकुं...