March 4, 2025 7:33 PM March 4, 2025 7:33 PM

views 13

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे देण्याची काँग्रेसची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आली असून नैतिकता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणजे झालं असं नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ का केलं नाही हा प्रश्न आहे, असं सपकाळ म्हणाले. सरकार मुंडेंना वाचवायचा प्रयत्न करत होतं असा आरोप सपकाळ यांनी केला.

January 22, 2025 7:44 PM January 22, 2025 7:44 PM

views 86

संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या फरार आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

बीड जिल्ह्याती मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. कृष्णा आंधळे आधीच्याही एका गुन्ह्यात फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराड याच्यासह विष्णु चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

January 15, 2025 6:47 PM January 15, 2025 6:47 PM

views 9

संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला न्यायालयानं २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी  सुनावली आहे. सुनावणीनंतर कराडला न्यायालयाबाहेर घेऊन जात असताना त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कराड समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करत कराडला बाहेर काढावं लागलं. 

January 14, 2025 7:46 PM January 14, 2025 7:46 PM

views 8

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका दाखल

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल करण्यात आला आहे. तसंच कराड याचा ताबा एसआयटीकडे देण्याचा निर्णय न्यायालायने घेतला आहे. प्रोडक्शन वॉरंट दाखवून कराड याचा ताबा एसआयटीकडे दिला जाईल, असं सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांनी सांगितलं.    खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला केज इथल्या न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कराडला १४ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर परळी शहरात कराड समर्थकांनी टायर जाळून निषेध केला. या आंदोलनामु...

January 11, 2025 7:59 PM January 11, 2025 7:59 PM

views 10

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका दाखल होणार

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायदा - मकोका दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास सीआयडी, एसआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

January 6, 2025 3:55 PM January 6, 2025 3:55 PM

views 11

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निःपक्षपाती तपासाची मागणी घेऊन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा तसंच वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदविला जावा तसेच तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी शिष्टमंडळानं केली.

January 6, 2025 10:00 AM January 6, 2025 10:00 AM

views 13

बीड हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणातल्या पाच आरोपींना पकडण्यात आलं असून, हत्या प्रकरणात सहभागी आणि मदत करणाऱ्यांना देखील सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

December 31, 2024 7:52 PM December 31, 2024 7:52 PM

views 6

संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींवर कारवाई करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे जबाबदार असतील, ज्यांच्याविरुद्ध पुरावे असतील त्या सर्वांवर कडक कारवाई करू, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात गुंडांचं, हिंसेचं, खंडणीखोरांचं राज्य चालू देणार नाही. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. त्यामुळेच वाल्मिक कराड यांना शरणागती पत्करावी लागली, असं सांगून उर्वरित फरार आरोपींना पकडण्यासाठी पथकं काम करत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.