September 23, 2024 12:53 PM
21
केदारनाथ, बद्रिनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांसाठी मुंबईहून भारत गौरव ट्रेन
केदारनाथ, बद्रिनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांसाठी भारतीय रेल्वे भारत गौरव रेल्वे गाडी सुरू करणार आहे. आयआरसीटीसी आणि उत्तराखंड राज्य पर्यटन महामंडळामार्फत हा उपक्रम राबवण्यात येणार. ही अकरा दिवसांची यात्रा असून, त्यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रिनाथ या तीर्थक्षेत्रांचा समावेश असेल. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून तीन ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता ही यात्रा सुरू होईल आणि त्याच स्थानकावर १३ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता परत येईल. प्रवाशांना कल्याण, पुण...