June 27, 2024 9:17 AM June 27, 2024 9:17 AM
21
जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकाला सुंदर बसस्थानक अभियानाचा पुरस्कार जाहीर
राज्य परिवहन महामंडळाच्या हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात अ वर्गामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकानं प्रथम क्रमांक मिळवला आहे. चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, या अभियानाअंतर्गत 'ब' वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या साकोली बसस्थानकाला तर 'क' वर्गामध्ये सातारा जिल्ह्यातल्या मेढा बसस्थानकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर राज्यात हे अभियान राबवण्यात आलं.