August 6, 2024 11:43 AM August 6, 2024 11:43 AM
7
बीमस्टेकच्या व्यापार परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन
बीमस्टेकच्या व्यापार परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन होईल. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत भारतासह बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या बीमस्टेकच्या सदस्य देशांमधील अनेक मंत्री, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, धोरणकर्ते, उद्योजक उपस्थित असणार आहेत. शाश्वत विकास, व्यापार सुविधा, प्रादेशिक दळणवळण, ऊर्जा सुरक्षा, सर्वसमावेशक वृद्धी आदी मुद्यांवर या परिषदेत चर...