January 31, 2025 7:27 PM January 31, 2025 7:27 PM

views 21

विक्रमवीर सचिन तेंडुलकरला ‘सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

विक्रमवीर सचिन तेंडुलकरला BCCI चा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर पॉली उम्रीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडूचा पुरस्कार पुरुष गटात जसप्रीत बुमराने तर महिलांमधे स्मृती मानधनाने पटकावला आहे.

January 17, 2025 1:36 PM January 17, 2025 1:36 PM

views 12

बीसीसीआयनं महिला प्रीमियर लीगचं वेळापत्रक केलं जाहीर

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिलांच्या प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सत्राची सुरुवात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातल्या सामन्याने होईल.   हा सामना १४ फेब्रुवारी रोजी वडोदऱ्यातल्या बीसीए मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. यंदा वडोदरा, बेंगळुरू, लखनौ आणि मुंबईत सामने होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना १५ मार्च रोजी मुंबईत होईल.

December 10, 2024 1:09 PM December 10, 2024 1:09 PM

views 11

बीसीसीआयचे कार्यकारी सचिव म्हणून देवजित सैकिया यांची नियुक्ती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्यकारी सचिव म्हणून देवजित सैकिया यांची नियुक्ती अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी केली आहे. सध्याचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यामुळे सैकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायमस्वरूपी सचिवांची नेमणूक होईपर्यंत सैकिया कार्यकारी सचिव म्हणून कार्यरत राहतील.