February 2, 2025 1:15 PM February 2, 2025 1:15 PM
29
ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना जीवन गौरव पुरस्कार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या कर्नल सी के नायडू जीवन गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना काल गौरवण्यात आलं. मुंबईत झालेल्या नमन पुरस्कार समारंभात आय सी सी चे अध्यक्ष जय शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . यावेळी गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पॉली उम्रीगर पुरस्कारानं तर महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिला उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.