January 17, 2025 1:36 PM

views 16

बीसीसीआयनं महिला प्रीमियर लीगचं वेळापत्रक केलं जाहीर

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिलांच्या प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सत्राची सुरुवात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातल्या सामन्याने होईल.   हा सामना १४ फेब्रुवारी रोजी वडोदऱ्यातल्या बीसीए मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. यंदा वडोदरा, बेंगळुरू, लखनौ आणि मुंबईत सामने होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना १५ मार्च रोजी मुंबईत होईल.

August 22, 2024 7:51 PM

views 13

भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर

भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केलं आहे. पुढच्या वर्षी २० जुलै ते ४ ऑगस्ट या काळात हा दौरा आयोजित केला असून, त्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्याआधी २२ जानेवारी १२ फेब्रुवारी या काळात इंग्लंडचा संघ भारतात येईल, त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही संघामधे पाच टी-ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामने होतील.

July 14, 2024 3:36 PM

views 15

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय

क्रिकेटमध्ये बर्मिंघम इथं झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला आणि जागतिक अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत क्रिकेट विश्वातले दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते.   पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १५६ धावा केल्या. भारताने फक्त १९ षटकांत १५९ धावा करत सामना जिंकला.   युवराज सिंह याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडून अंबाती रायडू, गुरकिरत सिंह, युसूफ पठाण यांनी दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.

July 12, 2024 12:38 PM

views 31

भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पल्लिकल आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर २६, २७ आणि २९ जुलैला वीस षटकांचे सामने होणार आहेत. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका कोलंबोच्या आर प्रेमदास आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर १, ४ आणि ७ ऑगस्टला होईल. भारतीय संघ आपले नवनियुक्त प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमवेत २२ जुलैला श्रीलंकेत पोहोचेल. या सामन्यांसाठीच्या संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.