November 4, 2025 8:03 PM November 4, 2025 8:03 PM

views 48

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर

आयसीसीनं जाहीर केलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट संघात भारताच्या जेमिमा रॉड्रिग्जने पहिल्या दहा फलंदाजात स्थान मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात केलेल्या शतकी खेळीमुळे तिच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. स्मृती मानधना मात्र अव्वल स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर घसरली असून सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं स्थान दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्व्हार्टला मिळालं आहे. दीप्ती शर्माला अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत चौथं स्थान मिळालं आहे.भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे.

September 28, 2025 1:41 PM September 28, 2025 1:41 PM

views 197

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष मिथुन मन्हास

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मिथून मनहास यांची निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र  सिंह यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मिथून हे प्रथम श्रेणी क्रिकेटचे खेळाडू असून आयपीएलसाठी खेळणारे ते जम्मू काश्मीरमधले पहिले खेळाडू आहेत. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी मनहास यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. रॉजर बिनी यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं.

May 24, 2025 8:03 PM May 24, 2025 8:03 PM

views 17

इंग्लड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी क्रिकेट संघ जाहीर

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी १८ सदस्यीय कसोटी क्रिकेट संघ आज जाहीर केला आहे. संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आलं असून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.   याशिवाय कसोटी संघात यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईस्वरन, करूण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॊशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप,अर्षदीप सिंग आणि कुलदीप यादव या ...

May 19, 2025 7:25 PM May 19, 2025 7:25 PM

views 13

आशियाई क्रिकेट स्पर्धेतल्या सहभागाशी कोणत्याही मुद्यावर चर्चा नाही – BCCI

आशियाई क्रिकेट स्पर्धेतल्या सहभागाशी संबंधित कोणत्याही मुद्यावर कोणत्याही पातळीवर चर्चाच झालेली नाही, असं बीसीसीआय़ अर्थात भारतीय नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं आहे. आशियाई चषक महिला आणि पुरुषांच्या स्पर्धांमधून बाहरे पडण्याचा निर्णय बीसीसीआयनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला कळवला असल्याच्या बातम्या याआधी पुढं आल्या होत्या. त्या सर्व निव्वळ तर्क आणि काल्पनिक असल्याचं सैकिया यांनी सांगितलं.  

May 19, 2025 2:55 PM May 19, 2025 2:55 PM

views 13

आशियाई क्रिकेट परिषदेच्या 2 स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा निर्णय

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आशियाई क्रिकेट परिषदेच्या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या विमेन्स इमर्जिंग टीम्स एशिया कप आणि सप्टेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धेत भारत आता खेळणार नाही.

May 13, 2025 3:37 PM May 13, 2025 3:37 PM

views 12

IPL सामने पुन्हा रंगणार…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयनं आयपीएल स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार येत्या शनिवारी म्हणजे १७ मे पासून पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकता नाईट रायडर्स संघांमध्ये बेंगळुरू इथं सामना होईल. तर ८ मे रोजी धरमशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये अर्ध्यावर सोडलेला सामना आता २४ मे रोजी जयपूरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ९ मे पासून आयपीएलचे उर्वर...

April 24, 2025 2:04 PM April 24, 2025 2:04 PM

views 17

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना BCCI ची श्रद्धांजली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कालच्या सामन्यादरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. तसंच खेळाडू, समालोचक आणि इतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. दरम्यान, आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरूमधे रायल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान सामना होणार आहे. सामना ७.३० वाजता सुरु होईल.

April 17, 2025 3:30 PM April 17, 2025 3:30 PM

views 13

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अभिषेक नायर आणि इतर दोन प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना केलं पदमुक्त

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि इतर दोन प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना पदमुक्त केलं आहे. बॉर्डर- गावस्कर चषक मालिकेत भारतीय संघाची कामगिरी समाधान कारक झाली नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशिक्षक म्हणून तीन वर्षांची सेवा झालेल्यांना पदमुक्त करण्यात येईल, असे संकेत मंडळानं काही दिवसांपूर्वीच दिले होते.

February 18, 2025 1:46 PM February 18, 2025 1:46 PM

views 13

चॅम्पियन्स करंडक २०२५ साठी भारतीय पुरुष संघाच्या जर्सीचं अनावरण

BCCI, अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी चॅम्पियन्स करंडक २०२५ साठी भारतीय पुरुष संघाच्या जर्सीचं अनावरण केलं आहे. BCCI नं समाज माध्यमांवरील एका पोस्टमध्ये भारतीय खेळाडूंची जर्सी प्रदर्शित करतानाची छायाचित्रं सामायिक केली आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ दोन्ही खांद्यावर तिरंगा आणि उजव्या बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफीचा लोगो असलेल्या निळ्या जर्सीमध्ये दिसेल. भारतीय क्रिकेट संघ परवा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल.

February 3, 2025 3:23 PM February 3, 2025 3:23 PM

views 15

१९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला बीसीसीआयकडून ५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर

सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयने ५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने पहिला टी-२० विश्वचषक २०२३मध्ये शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. तर निकी प्रसाद हिच्या नेतृत्वाखालील महिला संघाने दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं.