December 22, 2024 7:11 PM December 22, 2024 7:11 PM

views 10

पराभव न पटल्यानं मविआ ईव्हीएमवर बोलत असल्याची उपमुख्यमंत्री अजीत पवारांची टीका

राज्य विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीला पचला नाही, म्हणून त्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, अशी टीका  उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे. बारामती इथं आज त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लोकसभेतल्या निकालाबद्दल महायुतीनं ईव्हीएमला दोष दिला नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली. बारामतीच्या मतदारांनी एक लाखापेक्षा जास्त मतांच्या फरकानं आपल्याला निवडून दिलं, त्यामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे, असं सांगून बारामतीच्या वि...

November 6, 2024 3:23 PM November 6, 2024 3:23 PM

views 8

जीएसटी परिषदेच्या बैठकीला राज्याचे अर्थमंत्री गैरहजर राहतात – शरद पवार

जीएसटी परिषदेच्या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री उपस्थित राहत नसल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बारामतीमध्ये काल ते व्यापाऱ्यांना संबोधित करत होते. जीएसटी परिषदेच्या बैठकीला राज्याचे अर्थमंत्री सातत्याने गैरहजर राहतात. त्यामुळं राज्याची भूमिका मांडली जात नाही. केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे जीएसटीच्या संदर्भात समस्या घेऊन गेल्यावर त्यांनीही हेच सांगितल्याचं पवार म्हणाले. महाविकास आघाडीत सत्तेत आल्यावर जीएसटीचा प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडू असं आश्वासन त्यांनी दिलं.