September 20, 2025 2:35 PM September 20, 2025 2:35 PM

views 22

प्रतिबंधित नक्षली संघटना माओवादी कम्युनिस्ट पक्षाने अस्थायी शस्त्रबंदीचा निर्णय

प्रतिबंधित नक्षली संघटना माओवादी कम्युनिस्ट पक्षाने अस्थायी शस्त्रबंदीचा निर्णय घेतला आहे. बदलती जागतिक तसंच राष्ट्रीय परिस्थिती आणि प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री तसंच पोलीस प्रशासनाचं आवाहन, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं, या संघटनेच्या शिष्टाचार विभागाचे सदस्य मलौजुला वेणुगोपाल राव यांनी सांगितलं.   यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या शिष्टमंडळांशी चर्चेला तयार आहोत, असं राव यांनी सांगितल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.