September 26, 2025 9:59 AM September 26, 2025 9:59 AM

views 17

ग्राहकाभिमुख सेवा देण्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं बँकांना आवाहन

देशाच्या आर्थिक विकासात आर्थिक संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल पुण्यात केलं. बँक ऑफ महाराष्ट्रच्या एक्काणवाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बँकांनी ग्राहकाभिमुख सेवा द्यावी; तसंच तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग सेवा सुधारणं आणि नवकल्पनांना महत्त्व देणं गरजेचं असल्याचं सीतारामन म्हणाल्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी लघु उद्योगांसाठी युवकांना कर्ज आणि इतर सेवा द्याव्यात, असंही त्यांनी सुचवलं. सीतारामन यांनी बँक ऑफ ...