December 26, 2025 8:24 PM December 26, 2025 8:24 PM
15
बँक खात्यांमध्ये पडून असलेले पैसे खातेदारांना परत मिळणार!
विविध बँक आणि इतर खात्यांमध्ये पडून असलेले पैसे खातेदारांना परत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देशभरात विशेष मोहिम सुरू आहे. यामुळं आतापर्यंत २ हजार कोटी रुपये खातेधारकांना परत मिळाले आहेत, अशी माहिती अर्थ मंत्रालयानं आज दिली. विविध बँक खाती, वीमा खाती, म्युच्युअल फंड, लाभांश, समभाग आणि सेवानिवृत्तीचे लाभ यासाठी ही रक्कम नागरिकांनी वाचवून ठेवली होती. भारतीय बँकांमध्ये अशाप्रकारचे ७८ हजार कोटी रुपये पडून आहेत, ज्यावर कोणीही दावा केलेला नाही. म्युच्युअल फंडात दावा न केलेले असे १२ हजार कोटी ...