October 8, 2025 8:06 PM October 8, 2025 8:06 PM

views 56

बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न – SBIचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी

बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न असल्याचं स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज फिनटेक फेस्टमध्ये शेट्टी बोलत होते. यूपीआय वापरकर्ते आता डेबिट कार्डाशिवाय कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम जमा करू शकणार आहेत. तसंच, कर्जाचा हप्ताही भरणं आणि थर्ड पार्टी व्यवहार करणंही आता याच माध्यमातून शक्य होणार आहे.

May 19, 2025 8:18 PM May 19, 2025 8:18 PM

views 50

कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्जपुरवठा करण्याची बँकांना ताकीद

कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्जपुरवठा करा, अशी ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बँकांना दिली आहे. ते आज मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६७ व्या बैठकीत बोलत होते.  यावेळी राज्याचा २०२५-२६ या वित्तीय वर्षाचा ४४ लाख ७६ हजार ८०४ कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही मंजूर करण्यात आला.    शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सी-बिल मागू नका, हे वारंवार सांगितलं, तरी बँका सिबिल मागता...

August 19, 2024 8:24 PM August 19, 2024 8:24 PM

views 13

केंद्रीय अर्थमंत्र्यांची सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांबरोबर आढावा बैठक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजाचा आज आढावा घेत आहेत. नवी दिल्ली इथं होत असलेल्या  आढावा बैठकीत बँकांच्या ठेवी, कर्ज-ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली वाढ यांचं  मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, पीएम सूर्य घर आणि प्रधानमंत्री विश्व कर्मा योजनांचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नवीन सरकारच्या कार्यकाळातली सीतारामन यांची बँकांबरोबरची ही पहलीच आढावा बैठक आहे.