June 19, 2025 1:22 PM June 19, 2025 1:22 PM

views 13

तामिळनाडूच्या तिरुपूर इथून आज २६ बांग्लादेशी नागरिक अटक

तामिळनाडूच्या तिरुपूर इथून आज २६ बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. पल्लदम इथं काही नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर त्यांच्या घरांवर छापा घातला असता, बनावट कागदपत्रे, आधार कार्ड आढळून आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

April 29, 2025 2:43 PM April 29, 2025 2:43 PM

views 10

अवैधरित्या राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अवैधरित्या राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना काल पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर महात्मा फुले पोलीस ठाणे, टिळकनगर पोलीस ठाणे, खडकपाडा आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

February 8, 2025 11:20 AM February 8, 2025 11:20 AM

views 10

बेकायदेशीररीत्या रहात असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना मुंबईत अटक

मार्च 2020 पासून बेकायदेशीररीत्या देशात रहात असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना काल मुंबईत अटक करण्यात आली. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले सातही जण गेल्या पाच वर्षांपासून मुंबईतल्या चेंबूरच्या माहुल भागात रहात होते, त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रं नव्हती. तसंच त्यांनी बांगलादेशी असल्याचं कबूल केलं आहे, अशी माहिती आरसीएफ पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी दिली.