May 30, 2025 10:17 AM May 30, 2025 10:17 AM

views 20

दिल्लीत ९०० बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवण्यात यश

राजधानी दिल्लीत राहणाऱ्या सुमारे 900 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवण्यात आली असून योग्य पडताळणीनंतर त्यांना परत पाठवलं जाणार असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कागदपत्रं नसलेल्या स्थलांतरितांना परत पाठवण्याची प्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे.   सध्या सुरू असलेल्या भारत सरकारच्या 'पुश-बॅक' धोरणांतर्गत गेल्या ६ महिन्यांत दिल्लीतील सुमारे 700 बेकायदेशीर स्थलांतरितांना बांगलादेशला परत पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्...

May 24, 2025 2:29 PM May 24, 2025 2:29 PM

views 11

रत्नागिरीत १३ बांगलादेशी नागरिकांचं मायदेशी प्रत्यार्पण

रत्नागिरी जिल्ह्यात  बेकायदेशीरपणे  वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांचं शिक्षेनंतर मायदेशी प्रत्यार्पण करण्यात आलं आहे. पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या नागरिकांची सहा महिन्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्यात आलं.   भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी  पारपत्र  अधिनियम आणि परदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व १३ जणांची  मायदेशी प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आल्याचं रत्नागिरी पोलि...

April 28, 2025 8:24 PM April 28, 2025 8:24 PM

views 14

अहमदाबादमधे अवैधरित्या राहणारे ४०० बांगलादेशी संशयित ताब्यात

पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधे अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे. अहमदाबादमधे अवैधरित्या राहणाऱ्या चारशे संशयितांना पकडण्यात आलं आहे.  शहरातले बेकायदेशीर बांधकामं पाडण्याचे आणि बेकायदेशीर वीज जोडणी तोडण्याचे आदेश अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी दिले आहेत. मोरबी इथं दहा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नवसारी, जलालपोर, गंदेवी, चिखली, बिलीमोरा आणि खेरगाम मधेही शोधमोहीम सुरू आहे.

January 26, 2025 7:23 PM January 26, 2025 7:23 PM

views 9

पालघरमध्ये ९ बांगलादेशी नागरिकांना अटक

पालघर जिल्ह्यात अवैध कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. नालासोपाराच्या धानीवबाग भागातील गंगाडीपाडा येथून शुक्रवारी त्यांना पकडण्यात आलं. यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. ते पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यातील हकीमपूर गावातून भारतात घुसले होते.

January 21, 2025 8:45 AM January 21, 2025 8:45 AM

views 11

छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशी शोधमोहीम राबवण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांगलादेशी नागरिक शोधमोहीम राबवणार असल्याचा इशारा, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल सिल्लोड इथं उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची भेट घेऊन बांगलादेशी घुसखोर या विषयी चर्चा केली, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना शिरसाट यांनी, येत्या दोन आठवड्यात ही मोहीम राबवली जाणार असल्याचं सांगितलं...   पोलीस, कलेक्टर आणि ग्रामीण एसपी यांची संयुक्त टीम बनवून आठवडा किंवा पंधरवडामध्ये डोअर टू डोअर जाऊन या सगळ...

January 20, 2025 3:41 PM January 20, 2025 3:41 PM

views 13

भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या २५हून अधिक बांगलादेशींना अटक

भारतात घुसखाेरी करुन बेकायदा वास्तव्य करणाऱ्या २५ पेक्षा अधिक बांगलादेशींना ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातल्या ३५ पाेलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातल्या पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ल्यातला आराेपी बांगलादेशी संशयित असल्याची माहिती समाेर आल्यामुळे ही कारवाई आता आणखी तीव्र केली जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. त्यासाठी बांधकामांची ठिकाणं आणि मजूर वस्तीत काेंबिंग ऑपरेशन केलं जाणा...

January 2, 2025 8:30 PM January 2, 2025 8:30 PM

views 20

बांगलादेशी नागरिकांचे भारतात बेकायदेशीर स्थलांतर करणारी टोळी उघडकीस

बांगलादेशी नागरिकांचे भारतात बेकायदेशीर स्थलांतर करणारी एक टोळी दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणली आहे. पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिक आणि त्यांना मदत करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून बनावट कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. गेल्या महिन्यात १२ बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्यात आलं असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. 

December 31, 2024 8:12 PM December 31, 2024 8:12 PM

views 74

राज्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४३ बांग्लादेशी नागरिकांना अटक

दहशतवाद विरोधी पथकानं डिसेंबर महिन्यात राज्यभरातून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४३ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यातल्या १९ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या चार दिवसांत विक्रोळी, नाशिक, अकोला, नांदेड आणि औरंगाबादमधून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या  ९ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र तयार करून घेतली आहेत.

September 15, 2024 7:48 PM September 15, 2024 7:48 PM

views 16

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा झारखंडला मोठा धोका – प्रधानमंत्री

संथाल परगणा आणि कोल्हान भागातली लोकसंख्येची स्थिती झपाट्याने बदलत आहे, इथल्या आदिवासींची लोकसंख्या कमी होत आहे तर घुसखोर वाढत आहेत, या भागाला रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा धोका आहे अशी चिंता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज जमशेदपूर इथं आयोजित परिवर्तन महामेळाव्याला संबोधित करताना बोलत होते. झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाचीच सत्ता येईल असा विश्वासही ...