August 6, 2024 1:40 PM August 6, 2024 1:40 PM
11
बांग्लादेशातल्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी, युनायटेड किंगडमची मागणी
बांग्लादेशमधल्या सध्याच्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी, अशी मागणी युनायटेड किंगडमच्या सरकारनं केली आहे. बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या निवासस्थानामध्ये घुसून काल आंदोलकांनी तोडफोड केली. त्यानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि लष्करी विमानातून देश सोडला. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशमध्ये शांतता आणि लोकशाही कायम राहायला हवी, असं युकेचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी काल सांगितलं. बांगलादेशात गेल्या दोन आठवड्यांमध्ये अभूतपूर...