December 29, 2024 4:04 PM December 29, 2024 4:04 PM

views 2

नांदेडमध्ये कौठा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक

नांदेडमध्ये कौठा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाने काल अटक केली.आपली ओळख लपवून हा इसम बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. त्याच्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यासोबतच्या दोघांना हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूरजवळ अटक करण्यात आली.

December 18, 2024 6:18 PM December 18, 2024 6:18 PM

views 14

बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

बांगलादेशात टोंगी गाझीपूर इथं दोन समाजगटांमधे झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक जण जखमी झाले. बिस्वा इज्तेमा या धार्मिक कार्यक्रमासाठी मैदान ताब्यात घेण्यावरुन तबलिगी जमात या संघटनेच्या आणि भारतीय धर्मगुरु मौलाना साद कंधलवी यांच्या कार्यकर्त्यांमधे हा झगडा झाला. पोलिसांनी जखमींना विविध रुग्णालयांमधे दाखल केलं आहे. परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.  या आधी गेल्या ५ नोव्हेंबरला तबलिगी जमात च्या मौलाना झुबैर अहमद गटाने साद कंधलवी यांच्या ब...

December 17, 2024 8:45 PM December 17, 2024 8:45 PM

views 6

बांगलादेशात संसदीय निवडणूक घेण्याची परवानगी निष्पक्ष काळजीवाहू सरकारला देणारी तरतूद पुनर्स्थापित

बांगलादेशात संसदीय निवडणूक घेण्याची परवानगी निष्पक्ष काळजीवाहू सरकारला देणारी तरतूद तिथल्या उच्च न्यायालयाने पुनर्स्थापित केली आहे.  बांगला देशच्या संविधानातली ही तरतूद १५व्या घटनादुरुस्तीनुसार हटवण्यात आली होती. ही घटनादुरुस्ती संविधानाच्या मूलभूत तत्वांशी फारकत घेऊन लोकशाहीशी तडजोड करणारी होती असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती फरहा महबूब आणि न्यायमूर्ती देबाशीष रॉय चौधुरी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. बांगला देशात मुक्त आणि निःपक्षपाती निवडणुकीसाठी काळजीवाहू सरकारची नेमणूक केली जाते....

December 13, 2024 3:29 PM December 13, 2024 3:29 PM

views 16

बांग्लादेशात अल्पसंख्याकांच्या अत्याचाराविषयी प्रधानमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी – उद्धव ठाकरे

बांग्लादेशात अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचाराविषयी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई इथं झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी प्रधानमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती, पण त्याबाबत होकार न मिळाल्यामुळं हा विषय पत्रकार परिषदेत मांडला असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

December 10, 2024 7:28 PM December 10, 2024 7:28 PM

views 5

बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू समुदायावर अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलन

बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू समुदायावर अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. बांगलादेश सरकारने अत्याचाराविरोधात कठोर पावलं उचलावीत आणि हिंदू धर्मगुरूंची सुटका करावी, असा आग्रह भारत सरकारने करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाशिकमध्ये विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. धुळे शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. सोलापुरात अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. यावे...

December 8, 2024 8:23 PM December 8, 2024 8:23 PM

views 3

बांगलादेशाच्या भारताबरोबरच्या व्यापारात आलेल्या मंदीवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता

बांगलादेशाच्या भारताबरोबरच्या व्यापारात आलेल्या मंदीवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं बांगलादेशाचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन यांनी म्हटलं आहे. अशी  बातमी  स्थानिक वृत्त संस्थेनं दिली आहे. व्यापार मंदीची समस्या सौहार्दपुर्णतेनं सोडवली जाईल , असंही हुसेन यांनी सांगितलं. दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारात गेल्या २-३ महिन्यात बरीच घाट झाली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रि  उद्या बांगलादेशात येणार असून त्यांच्याबरोबर द्विपक्षीय व्यापार आणि परस्पर चिंतेच्या विषयांवर...

December 8, 2024 8:47 PM December 8, 2024 8:47 PM

views 9

U१९ आशिया चषक : भारताचा ५९ धावांनी पराभव होऊन बांग्लादेश विजयी

दुबई इथं झालेल्या १९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा ५९ धावांनी पराभव करून बांग्लादेशानं विजेतेपद पटकावलं. विजेतेपदासाठी आज झालेल्या अंतिम सामन्यात बांग्लादेशानं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांग्लादेशाच्या गोलंदाजीसमोर भारताचा संपूर्ण संघ ३५ षटकं आणि दोन चेंडूत केवळ १३९ धावा करून तंबूत परतला.   भारताच्या वतीनं कर्णधार मोहम्मद आमन यानं सर्वाधिक २६ धावा केल्या. अंतिम सामन्यात भारताचे ३ तर संपूर्ण स्पर्धेत एकूण १० गडी बाद केलेल्या बांग्लादेशाचा गोल...

December 8, 2024 3:41 PM December 8, 2024 3:41 PM

views 9

U१९ आशिया चषक : अंतिम सामन्यात बांग्लादेशाचं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान

दुबई इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशानं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी देखील बांग्लादेशाच्या फलंदाजीला लगाम घालत, त्यांचा संपूर्ण संघ १९८ धावांतच तंबूत धाडला. बांग्लादेशाच्या वतीनं मोहम्मद रिझान यानं सर्वाधिक ४७ धावा केल्या. भारताच्या युद्धजीत, चेतन आणि हार्दिक यांनी प्रत्येक दोन गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारता...

December 8, 2024 3:25 PM December 8, 2024 3:25 PM

views 23

कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धेत भारताचा सामना बांगलादेशाबरोबर होणार

ओमानची राजधानी मस्कत इथं सुरु असलेल्या कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेशाबरोबर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री साडे आठ वाजता सुरू होईल. भारतीय संघाचं नेतृत्व ज्योती सिंह हिच्याकडे सोपवण्यात आलेलं असून साक्षी राणा उपकर्णधार आहे. काल स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात चीननं बांगलादेशचा १९ - ० असा दणदणीत पराभव केला.   अ गटात झालेल्या इतर सामन्यात मलेशियानं थायलंडला ३-० असं पराभूत केलं. ब- गटातल्या सामन्यात जपाननं श्रीलंकेचा १५-० नं पराभव केला. पुढच्या ...

December 4, 2024 10:34 AM December 4, 2024 10:34 AM

views 3

बांग्लादेशमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटनकडून व्यक्त

बांग्लादेशमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटननं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटक भेट देत असलेली ठिकाणं, गर्दीची ठिकाणं, सांस्कृतिक ठिकाणं आणि राजकीय सभांच्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटनच्या फॉरेन कॉमनवेल्थ आणि डेव्हलमेंट ऑफिसनं वर्तवली आहे.