November 27, 2025 8:20 PM November 27, 2025 8:20 PM

views 10

शेख हसीना यांना भूखंड घोटाळा प्रकरणी २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बांग्लादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना आज ढाक्याच्या एका न्यायालयाने भूखंड घोटाळा प्रकरणी दोषी ठरवून २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. त्याच आरोपाखाली हसीना यांच्या दोन्ही मुलांना प्रत्येकी ५ वर्षांची, तर त्यांच्या २० मंत्र्यांना निरनिराळ्या कालावधीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याआधी १७ नोव्हेंबर रोजी बांग्लादेशच्या एका विशेष फौजदारी न्यायाधिकरणाने शेख हसीना आणि तत्कालीन गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांना मानवताविरोधी गुन्ह्यांखाली मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. शेख हसीना यांन...

January 8, 2025 1:24 PM January 8, 2025 1:24 PM

views 14

माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह ९७ जणांची पारपत्रं बांग्लादेश सरकारकडून रद्द

बांगलादेशाच्या इमिग्रेशन आणि पारपत्र विभागाने बेपत्ता झालेल्या आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या हत्याकांडात कथित सहभागामुळे माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह ९७ जणांची पारपत्रं रद्द केली आहेत. बांगलादेश सरकारच्या मुख्य सल्लागारांचे उपसचिव अब्दुल कलाम आझाद यांनी ही माहिती वार्ताहर परिषदेत दिली आहे.   यापैकी २२ जणांची पारपत्र बांगलादेशाहून स्वतःहून बेपत्ता झाल्यामुळे तर ७५ जणांची पारपत्र जुलैमध्ये झालेल्या हत्याकांडात सहभागी झाल्यामुळे रद्द झाल्याची माहिती त्यांनी दिली. शेख हसीना य...

November 18, 2024 8:10 PM November 18, 2024 8:10 PM

views 10

बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसिना आणि इतर ४५ जणांना एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश

विद्यार्थी आंदोलना दरम्यान झालेल्या कथित नरसंहाराच्या दोन प्रकरणात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय फौजदारी लवादानं बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसिना आणि इतर ४५ जणांना एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ९ माजी मंत्र्यांसह  १३ आरोपींना आज लवादासमोर हजर करण्यात आलं.  या प्रकरणाची पुढची सुनावणी १८ डिसेंबरला होणार आहे.