August 6, 2024 11:44 AM August 6, 2024 11:44 AM
14
बांगलादेशाची संसद बरखास्त करून हंगामी सरकार स्थापन केलं जाईल – बांगलादेशाचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन
बांगलादेशची संसद बरखास्त करून हंगामी सरकार स्थापन केलं जाईल, असं बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी म्हटलं आहे. ढाका इथल्या बंगभवन इथं तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत काल त्यांनी ही माहिती दिली. बांगलादेशमधली सध्याची अराजकता दूर करण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. नजरकैदेत असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची सुटका करण्याचा निर्णयही य...