May 18, 2025 3:12 PM May 18, 2025 3:12 PM

views 1

बांगलादेशातून आयात होणाऱ्या मालावर नवे निर्बंध

बांगलादेशातून आयात होणाऱ्या काही वस्तूंसाठी परदेश व्यापार महासंचालनालयानं नवीन निर्बंध घातले आहेत. बांगलादेशातून सर्व प्रकारच्या तयार कपड्यांच्या आयातीला भूपृष्ठ-मार्गे बंदी असेल, पण न्हावा शेवा आणि कोलकाता या सागरी बंदरांमधून या वस्तूंच्या आयातीला परवानगी असेल. त्याशिवाय, फळं, फळांच्या स्वादाची आणि कार्बोनेटेड पेयं, प्रक्रियाकृत  अन्नपदार्थ, कापूस आणि कापसाच्या धाग्याचा कचरा, रंगद्रव्य, प्लास्टिसायझर्स आणि देशांतर्गत उद्योगांसाठी वापरले जाणारे ग्रॅन्युल वगळता, प्लास्टिक आणि पीव्हीसीच्या तयार वस...