September 13, 2025 3:16 PM September 13, 2025 3:16 PM

views 9

बांगलादेशात पुढच्या वर्षी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत मतदान होईल

बांगलादेशात पुढच्या वर्षी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत मतदान होईल, अशी घोषणा सध्याच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार शफीक उल आलम यांनी काल केली. मागुरा जिल्ह्यात श्रीपूर इथं ते पत्रकारांशी बोलत होते. ही निवडणूक केवळ प्रशासनाचं भविष्यच ठरवणार नाही तर त्यानंतरच्या निवडणुका आणि बांगलादेशच्या एकूण राजकीय व्यवस्थेचा पाया घालेल, असंही ते म्हणाले. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनीही गेल्या आठवड्यात फेब्रुवारी २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुका वेळापत्रकानुसारच झाल्या पाहिजेत, असं ...

April 27, 2025 6:43 PM April 27, 2025 6:43 PM

views 12

बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूक वेळेवर न घेतल्यास देशासमोर गंभीर आव्हान-CPD

बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूक वेळेवर घेतली नाही तर देशासमोर गंभीर आव्हानं उभी राहू शकतात, असा इशारा सेंटर फॉर पॉलीसी डायलॉग या संस्थेनं दिला आहे. निवडणुका घ्यायला उशीर झाला तर गुंतवणूकदारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं सीपीडीचे प्राध्यापक मुस्तफिजुर रेहमान यांनी म्हटलं आहे. गुंतवणूक येण्यासाठी राजकीय स्थैर्य महत्वाचं असतं, नुकत्याच झालेल्या गुंतवणूक परिषदेमुळे थोडीशी आशा निर्माण झाली असली तरी प्रत्यक्ष गुंतवणूक फारशी झाली नाही, असं रेहमान म्हणाले. यावेळी रेहमान यांनी गुंतवणुकीच्या दृष्टीनं बां...

August 26, 2024 1:15 PM August 26, 2024 1:15 PM

views 11

बांगलादेशातील निवडणुका राजकीय स्थिती आणि नागरिकांच्या मतानुसार घेतल्या जातील – मुहम्मद युनुस

बांगलादेशातील निवडणुकांचा निर्णय हा राजकीय स्थिती आणि बांगला देशच्या नागरिकांच्या मतानुसार घेतला जाईल, असं बांगला देशातल्या हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनुस यांनी म्हटलं आहे. हे हंगामी सरकार किती दिवस चालेल हेही बांगला देशाच्या नागरिकांच्या मनावरच असल्याचं त्यांनी काल देशाला उद्धेशून केलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातील प्रशासन, न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगामधील आवश्यक फेरबदल झाल्यानंतर निर्भय वातावरणात मुक्त निवडणुका घेतल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं. देशात भ्रष्टाचार, लूट आणि हिंसाचार...