August 7, 2024 9:47 AM August 7, 2024 9:47 AM

views 10

बांग्लादेशमधला भारतीय दूतावास तिथल्या भारतीय नागरिकांच्या सतत संपर्कात

बांग्लादेशमधलं भारतीय दूतावासाचं कार्यालय तिथल्या भारतीय नागरिकांच्या सतत संपर्कात असल्याचं काल सरकारनं संसदेत सांगितलं. तिथल्या अल्पसंख्याकांच्या बाबतीतल्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर बांग्लादेशमधल्या स्थितीवर चर्चा करताना म्हणाले. या घडीला 19 हजार भारतीय नागरिक बांग्लादेशात आहेत. यात 9 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भारतीय उच्चायुक्तालयाच्या सूचनेनंतर बरेच विद्यार्थी गेल्या महिन्यात भारतात परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.

August 5, 2024 2:49 PM August 5, 2024 2:49 PM

views 6

बांग्लादेश मध्ये सुरू असलेल्या हिंसक संघर्षात १३ पोलिस कर्मचाऱ्यांसह ९० जण ठार

बांग्लादेश मध्ये सुरू असलेल्या हिंसक संघर्षात काल १३ पोलिस कर्मचाऱ्यांसह ९० जण ठार झाले. तर अनेक जखमी झाले आहेत. आरक्षण विषयक सुधारणा चळवळीच्या कार्यकर्त्यांनी काल देशव्यापी असहकार आंदोलन सुरू केलं आहे. देशात चळवळीदरम्यान झालेल्या ठार झालेल्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूची जबाबदारी घेऊन सरकारनं राजीनामा देण्याची मागणी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. बांग्लादेश सरकारनं काल ढाका आणि देशाच्या इतर काही भागात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली. दरम्यान, बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी ...