July 14, 2025 10:38 AM July 14, 2025 10:38 AM

views 1

बनावट खतांविरुद्ध तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश

बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांविरुद्ध तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रानं दिले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत देशातील सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.   बनावट खतांची विक्री, खतांचा काळाबाजार यासारख्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार खतांचा पुरवठा करणं आवश्यक आहे, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.