October 14, 2025 7:08 PM October 14, 2025 7:08 PM
292
बांबू लागवड आणि प्रक्रीया उद्योगाला चालना देण्यासाठी ‘बांबू धोरण’ जाहीर
राज्य सरकारनं आगामी ५ वर्षांसाठीच्या बांबू धोरणाला आज मंजुरी दिली. यामुळं ५० हजार कोटींची गुंतवणूक आणि ५ लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे. राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन २०२३ शी सुसंगत बांबू धोरणाला राज्य मंत्रीमंडळाची आज मंजुरी मिळाली. या धोरणात बांबू शेतकरी उत्पादक संघटना (FPO), कंत्राटी शेती आणि ऊर्जा, उद्योग आणि इतर घरगुती क्षेत्रांमध्ये बांबूच्या वापराला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. राज्यभरात १५ बांबू क्लस्टर्स स्थापन केले जाणार असून दुर्गम भागातल्या बांबू कारागीरांसाठी सुविध...