December 8, 2024 7:04 PM December 8, 2024 7:04 PM
19
‘मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ग्रामस्थांच्या निर्णयावर आक्षेप घेण्याचं कारण नाही’
मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार उत्तम जानकर हे देखील उपस्थित होते. मारकडवाडी ग्रामस्थांनी स्वतःच्या मतांची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर प्रशासनानं आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही, असंही ते म्हणाले. मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी गावोगावी ठराव घेण्याची सूचना त्यांनी दिली. लोकशाही टिकविण्यासाठी ईव्हीएम मशीन नको ही चळवळ अधिक तीव्र कर...