January 23, 2026 6:07 PM
17
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कल्याणकारी योजना राबवणार – उपमुख्यमंत्री शिंदे
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आज मुंबईत आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. घरोघरी आरोग्य तपासणीची सुविधा देणारी आरोग्य आपल्या दारी मोहीम प्रथम मुंबईत आणि नंतर राज्यात इतरत्र राबवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. प्लास्टिक मुक्त गड किल्ले अभियान जागतिक वारसा यादीतल्या ११ किल्ल्यांवर आणि नंतर इतर किल्ल्यांवर चालवण्यात येणार आहे. त्य...