June 7, 2025 3:01 PM June 7, 2025 3:01 PM

views 3

देशभरात बकरी ईदचा उत्साह

देशभर आज पारंपरिक उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केल्या जात असलेल्या ईद-ऊल-अझहा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुस्लिम बांधवांनी ईदगाह आणि मशिदीत जाऊन ईद नमाज अर्पण केले आणि नंतर परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. राजधानी दिल्ली जमा मशिद, फतेहपुरी मशिद आणि शाही ईदगाह इथं ईदचा मुख्य सोहळा झाला.    ईदचा सण हा त्याग, श्रद्धा आणि मानवी मूल्यांचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे....