October 24, 2024 7:21 PM

views 13

विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीची पहिली यादी जाहीर

बहुजन समाज पार्टी द्वारे आज विधानसभा निवडणुकीसाठी ६२ उमेदवारांची पहिली यादी जारी करण्यात आली आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मधून विजय वाघमारे, अकोला जिल्ह्यातील बाळापुर मधून भाग्यश्री गवई, अकोला पश्चिम मतदारसंघातून डॉक्टर धनंजय नालट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आणि नागपूर उत्तर मधून बुद्धम राऊत आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मधून सुभाष रणवीर यांना उमेदवारी दिली आहे.