November 3, 2025 1:34 PM November 3, 2025 1:34 PM
17
बहारीनचे परराष्ट्र मंत्री अब्दुल लतिफ बिन रशीन अलजयानी भारत दौऱ्यावर
बहारीनचे परराष्ट्र मंत्री अब्दुल लतिफ बिन रशीन अलजयानी काल रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्ली इथं पोहोचले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्याचं स्वागत केलं. हे दोन्ही नेते पाचव्या भारत-बहारीन संयुक्त उच्च आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्ष पद भूषवणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या समाजमाध्यमावर दिली आहे. या बैठकीत होणारी चर्चा फलदायी होईल, असा विश्वास जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात व्यक्त केला आहे.